ब्राझिल हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
República Federativa do Brasil ब्राझिलचे संघराज्यीय प्रजासत्ताक
ब्राझिल (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil, मराठी: ब्राझिलचे संघराज्यीय प्रजासत्ताक) हा दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठा देश आहे. हा क्षेत्रफळानुसार जगातला पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. याच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरिनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलिव्हिया व पेरू, नैऋत्येस आर्जेंटिना व पॅराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.