कॅनडा हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
इ.स. २००६च्या अंदाजानुसार कॅनडाची लोकसंख्या ३,१६,१२,८९७ आहे. येथील लोकसंख्येतील वाढ मुख्यत्वे बाहेरदेशातून येणार्या लोकांमुळे आहे. वस्तीवृद्धीचा दर वर्षास ५.४% आहे.
कॅनडातील तीन चतुर्थांश वस्ती कॅनडा व अमेरिकेच्या सीमेपासून १५० कि.मी. (९० मैल) अंतराच्या आत राहते.
धर्म
धर्मनिरपेक्षता ही कॅनडातील जनतेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. इ.स. २००१च्या वस्तीगणनेनुसार कॅनडातील ७७.१% स्वतःला क्रिश्चन मानतात, पैकी कॅथोलिक पंथीय सगळ्यात जास्त (एकूण वस्तीच्या ४३.६%) तर युनायटेड चर्च ऑफ कॅनडाचे अनुयायी दुसर्या क्रमांकावर आहेत. १६.५% केनेडियन स्वतःला निधर्मी मानतात. उरलेले ६.३% लोक इतरधर्मीय आहेत पैकी १.९% मुसलमान तर १.१% ज्यू आहेत.
शिक्षण
कॅनडातील प्रांत व प्रदेश आपआपल्या भागातील शिक्षणव्यवस्थेची रचना ठरवतात. या सगळ्या व्यवस्था साधारण सारख्याच असतात परंतु त्यात प्रदेशानुसार संस्कृती व भूगोलाबद्दलची माहिती वेगवेगळी असते.[१] प्रदेशानुसार वयाच्या ५-७ पासून १६-१८ वर्षांपर्यंतचे शिक्षण सक्तीचे आहे. यामुळे कॅनडातील साक्षरताप्रमाण ९९% आहे. उच्चमाध्यमिक शिक्षणसुद्धा प्रांतीय व प्रादेशिक सरकार चालवतात व त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून येतो. याशिवाय केन्द्र सरकारकडून संशोधनासाठी निधी आणि विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शिष्यवृत्ती दिल्या जातात. इ.स. २००२मध्ये कॅनडातील २५ ते ६४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ४३% व्यक्तींनी उच्चमाध्यमिक शिक्षण घेतलेले होते तर २५-३४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ५१% व्यक्ती उच्चशिक्षित होत्या.[२]