फेब्रुवारी ६ - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
फेब्रुवारी ६ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
सप्टेंबर ९ - नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमदशहा मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.
सप्टेंबर ९ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
डिसेंबर १३ - पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचार्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.