अफगाणिस्तान हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
د افغانستان اسلامي جمهوریت
(पश्तू: द अफगानिस्तान इस्लामी जोम्होरियत)
جمهوری اسلامی افغانستان
(फारसी: जुम्हुरीये इस्लामीये अफगानिस्तान) अफगाणिस्तानाचे इस्लामी प्रजासत्ताक
अफगाणिस्तान (अधिकृत नाव: पश्तू: افغانستان اسلامي جمهوریت, फारसी: جمهوری اسلامی افغانستان, मराठी: अफगाणिस्तानाचे इस्लामी प्रजासत्ताक) हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्य पूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, वांशिक, भाषिक व भौगोलिक संबंध जोडले गेले आहेत.
राजधानी काबुल अफगाणिस्तानचे सगळ्यात मोठे शहर आहे. येथे दहा लाखांपेक्षा अधिक व्यक्ती राहतात. याशिवाय कंदहार, हेरत, मझार ए शरीफ, जलालाबाद, गझनी व कुंडुझ ही इतर मोठी शहरे आहेत.